You are currently viewing रेशीमकोष

रेशीमकोष

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी यांची काव्यरचना

भिजले चांदणे भिजली माती
सागरातील माणिक मोती

जसा फुटावा रेशीमकोष
उसवली धरती घेऊन श्वास
सागर लाटा घेऊन हाती
भिजली नक्षत्रे सजली धरती

नवगतांचे होता स्वागत
रती मदन होते ऐटीत
ती मिलनाची रात होती
थिजला सागर भिजला मोती

स्वर्ग सुखाचे उघडे द्वार
तृषार्थ होऊन अधीर चकोर
झिरपल्या त्या प्रेम वाती
भिजल्या वाती उझळीत पणती

मधूकोषातील मधु मकरंद
आस्वादित आंनद स्वच्छंद
गाभाऱ्यातील कर्पुर आरती
गरजला मेघ भिजली धरती

कैक क्षण हे येती जाती
नवसृजनाच्या नवं पाती
युगांन युगे सरल्या राती
नटले सृजन नटली धरती

सर्व काही उघड गुपित
परंपरेचे होता पाईक
ऋणानुबंध जमता नाती
भिजले चांदणे भिजली माती

प्रो डॉ जी आर (प्रवीण) जोशी

अंकली बेळगाव

कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा