जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना
प्रतिष्ठा या जगामध्ये
विकत घेता येत नाही
तुमच्याबद्दल स्तुती ही
तुमच्या प्रतिष्ठेची ग्वाही..
प्रतिष्ठा वाढत नाही
सोशल मीडियावर
तुमच्याबद्दल असावा
इतरांच्या हृदयी आदर..
टाळ्यांचा कडकडाट
जेव्हा नावानेच मिळतो
प्रतिष्ठेचा खरा सोहळा
तेव्हाच साजरा होतो..
प्रतिष्ठा म्हणजे असते
परक्यांनी केलेला सन्मान
तुमच्यामुळे मायबापाची
समाजात वाढलेली शान..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई