स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून करायला हवी.
कणकवली (प्रतिनिधी)
एक स्त्री म्हणजे परमेश्वराची साक्षात अशी कलाकृती आहे.जिला तो स्वत: नमन करतो.कारण एका स्त्री मध्ये वात्सल्य, मांगल्य, मातृत्व आणि कर्तृत्व असते.जागतिक महिला दिनाचा मुख्य हेतु म्हणजे महिला सबलीकरण करणे हा आहे.हा दिवस महिलांप्रती आदर प्रेम करण्याचा दिवस आहे.स्त्रीला अनेक नाती जपावी लागतात.प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ स्त्री असते.महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठी साजरा केला आहे म्हणूनच स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून करायला हवी.असे प्रतिपादन विकास समूहाच्या अध्यक्षा मनवा शिरवलकर यांनी केले.
शिरवल ग्रामपंचायत येथे संकल्प ग्रामसंघाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सरपंच महेश शिरवलकर, संकल्प ग्रामसंघ अध्यक्षा रसिका शिरवलकर, सचिव तनिष्का कुडतरकर ,कोषाध्यक्ष सुप्रिया तांबे ,सीआरपी सारिका गुरव लिपिका प्रज्ञा मेस्त्री, ग्रा.पं. सदस्य गौरी वंजारे, सुरेखा मेस्त्री ,माजी सरपंच सुधा कुडतरकर ,विशाखा तांबे, माजी पं.स. सदस्या प्रतिभा पांचाळ, आशा सेविका मेघना पांचाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मनवा शिरवलकर म्हणाल्या कि आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती पथावर आहे.स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरातून करायला हवी.आणि तिच्या कर्तृत्वाला तिच्या नेतृत्वाला तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला सलाम करायला हवा.
सरपंच महेश शिरवलकर मार्गदर्शन करताना म्हणाले कि,पूर्वी महिलांना चूल आणि मूल यामध्ये गुरफटून रहावे लागत असे. मात्र आता महिला एकत्रित येऊन, बचत गटाची स्थापना करुन त्यामधून एखाद्या उद्योगाची उभारणी करून स्वयंरोजगाराची निर्मिती करीत आहेत. त्यातून स्वतः व कुटुंबाचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत मिळत आहे.यामुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. आज शिरवल गावात आठ बचतगट कार्यरत आहेत.विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली प्रगती करत आहेत.बचत गटांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाच्या विविध योजना शिरवल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण राबविणार असुन महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील आठही बचतगटाच्या महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बचतगटाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेच्या वेळी शेखर समूह रतांबेवाडी आणि देशांत्री देवी समूह तळेवाडी यांनी बचतगटाचे स्टाॅल लावून आर्थिक उन्नती केल्याबद्दल संकल्प ग्रामसंघ शिरवलच्या वतीने सरपंच महेश शिरवलकर यांच्या हस्ते शेखर समूह रतांबेवाडी आणि देशांत्री देवी समूह तळेवाडी यांना सन्मानित करण्यात आले.
फोटो: शिरवल : शिरवल ग्रामपंचायत येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच महेश शिरवलकर, ,व्यासपीठावर उपस्थित मनवा शिरवलकर,रसिका शिरवलकर, तनिष्का कुडतरकर,सारीका गुरव आदी