You are currently viewing कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती संघटीत लढा उभारणार

कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती संघटीत लढा उभारणार

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरात कर्जदारांना सन्मानाने जगता यावे , यासाठी त्यांच्यावरील बॅंक व खासगी फायनान्स कंपन्यांच्या बेकायदेशीर कर्ज वसुलीच्या
अन्याय – अत्याचाराला रोखण्यासाठी संघटीत लढा उभारण्याचा एकमुखाने निर्धार महेश क्लबमध्ये आयोजित केलेल्या कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्या भव्य मेळाव्यात करण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
लोक जनशक्ती महाराष्ट्र प्रदेश कायदा विभागाचे अध्यक्ष
अडव्होकेट आप्पासाहेब घोरपडे ,
मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट नियती ओभान , महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲडव्हो़केट प्रसाद करंदीकर ,कृती समितीचे सल्लागार ॲड.अभिजीत मेरुडे ,ॲड.राहन ओभान , ॲड.राहुल वारंग ,समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष योगेश वाघमारे , शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंञमागधारक सेना महाराष्ट्र राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशातील विविध राज्यांमध्ये सरकारी व सहकारी बँकांबरोबरच खासगी फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या कर्जदारांचे आर्थिक शोषण सुरू केले आहे.ते वेळीच रोखण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने कर्जदार जामीनदार हक्क हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने संघटितरीत्या लढा सुरू आहे.
या लढ्यामध्ये सर्वांनी संघटित होऊन सहभागी व्हावे आणि न्याय मिळवून घ्यावा ,याच उदात्त हेतूने इचलकरंजी शहरातील महेश क्लबमध्ये कर्जदार जामीनदार हक्क हक्क बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शक
अडव्होकेट आप्पासाहेब घोरपडे ,
ॲड. नियती ओभान ,ॲड. प्रसाद करंदीकर ,
ॲड.अभिजीत मेरुडे ,ॲड.राहन ओभान यांच्यासह मान्यवरांनी
विविध उदाहरणांव्दारे बॅंकाबरोबरच खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीच्या नावाखाली बेकायदेशीररित्या
कर्जदारांची होत असलेली आर्थिक पिळवणूक स्पष्ट केली.तसेच महापूर ,नोटबंदी , जीएसटी ,कोरोना व लाॅकडाउन अशा लागोपाठ आलेल्या संकटांमुळे कर्जदार अधिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.तरी देखील
बॅंक व खासगी कंपन्यांनी बेकायदेशीररित्या
कर्ज वसुलीचा तगादा लावण्याचा प्रकार सुरुच ठेवला आहे.यामध्ये
जप्तीची कारवाई , आर्थिक व मानसिक शोषण अशा प्रकारांमुळे अनेकांवर आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ येत असल्याचे सांगत बॅंकाबरोबरच खासगी कंपन्यांनी सेवा देण्याच्या नावाखाली सुरु केलेला सावकारीचा हा प्रकार वेळीच रोखून कर्जदारांना देखील सन्मानाने जगता येईल , यासाठी कर्जदार जामीनदार हक्क बचाव क्रुती संघर्ष समिती लोकशाहीच्या मार्गाने लढा देत असल्याचे सांगितले.तसेच या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होवून न्याय मिळवून घ्यावा ,असे आवाहन केले.
यावेळी कर्जदार जामीनदार हक्क बचाव क्रुती संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश वाघमारे यांनी
कर्जदारांचे जगणे मुश्किल झाले असून याला वाचा फोडून लोकशाहीच्या मार्गाने योग्य न्याय मिळण्यासाठी कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून सुमारे २०० कर्जदारांच्या मालमत्तेवरील जप्तीची कारवाई थांबवण्यात आल्याचे सांगितले ‌.या पुढील काळात देखील
ॲड.आप्पासाहेब घोरपडे व सर्व कायदेतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समिती बॅंक व खासगी फायनान्स कंपन्यांची बेकायदेशीर कर्जवसुली थांबवून
अन्याय , अत्याचारित पिडीत कर्जदारांना न्याय देण्यासाठी कटीबध्द राहिल ,अशी ग्वाही देत या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे , असे आवाहन केले.यावेळी काही कर्जदारांनी बॅंक व फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या वसुलीच्या ञासा संदर्भात काही प्रश्र्न उपस्थित केले.या प्रश्नाला ॲड.आप्पासाहेब घोरपडे ,ॲड.नियती ओभान , ॲड.प्रसाद करंदीकर ,
ॲड .रहान ओभान ,ॲड.अभिजीत मेरुडे आदींनी समाधानकारक उत्तरे देवून कर्जदारांना दिलासा दिला.
या मेळाव्यास कर्जदार , जामीनदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेश वाघमारे,सोमनाथ वाघमारे,
कृती समितीचे प्रसाद मेटे ,
प्रकाश तावरे ,अनिल लोकरे , नंदकुमार लोखंडे ,पत्रकार सागर बाणदार, दगडू जगताप, वैभव पवार , गजानन शिंदे,सागर माने, सुरज गंथडे, अमोल खडसे, वजीर शेख, नितीन अडके, नंदकिशोर एडके, विशाल ढवळे, राजू डफेदार, अर्जुन पाटील, ओमकार आवटे, सागर मरवडे, किशोर साळी, आदित्य वाघमारे यांच्यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा