You are currently viewing विचारांचा गुंता

विचारांचा गुंता

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना

स्वतःला कितीही
शांत ठेवण्याचा
प्रयत्न केला तरी
विचारांचा गुंता सुटत नाही
ठरवूनही माणसाला
विचारांपासून
मुक्त होता येत नाही.

विचारांची गर्दी
मेंदूच्या अवतीभवती
घोळताना
माणसाच्या सय्यमाची
सत्वपरिक्षाच असते
खरच जबाबदारीच ओझ
पेलवतांना
मनात अस्वस्थता दिसते

विचार चक्रात भरकटत
जातो माणूस तेव्हा
मेंदू अनेक विचार घेवून
पळत असतो
कुठे स्वार्थ तर
कुठे परमार्थ
शोधताना दिसतो

विचारांच वादळ कितीही असल
तरी आत्मसन्मानाला डाग
लागू द्यायचा नाही
अवघड वाटेवर
पावले टाकताना
अंदाज चुकू घ्यायचा नाही

विचारांच्या जाळ्यात
अडकताना
काय चुक काय बरोबर
एकदा मनाला विचारून घ्यायचे
विचारांचा गुंता सोडवतान
विचारांच्या पलिकडचे
सुंदर जग बघून घ्यायचे

अरे असु दे विवंचना कितीही
माणसाने चिंता मुक्तच रहायचं
सुरेख आयुष्य आहे यारो
मस्त स्वच्छंदी जगायचं

*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९३६२८

प्रतिक्रिया व्यक्त करा