You are currently viewing तांबळडेग समुद्र किनारी ऑलिव्ह रिडलीची ९३ पिल्ले समुद्राच्या कुशीत

तांबळडेग समुद्र किनारी ऑलिव्ह रिडलीची ९३ पिल्ले समुद्राच्या कुशीत

ऑलिव्ह रिडली या दुर्मिळ जातीच्या समुद्र कासवाच्या अंड्यांमधून ९३ पिल्लांनी तांबळडेग समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या ठिकाणी जन्म घेतला आहे. कासवाच्या संरक्षित केलेल्या घरट्यात मधून जन्म घेतलेल्या या कासवांच्या पिल्लांना मंगळवारी तांबळडेग येथील समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आले. या वेळी तेथे उपविभागीय अधिकारी सौ वैशाली राजमाने, उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे, देवगड जामसंडे न. पं. मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, कुडाळ न. पं. मुख्याधिकारी नितीन गाढवे उपस्थित होते.

९ जानेवारी रोजी तांबळडेग समुद्रकिनारी कासव मित्र सागर मालंडकर यांना ऑलिव्ह रिडली कासवाची अंडी आढळून आली. त्यानंतर वनविभाग व प्राणी मित्र प्रत. नागेश दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कासवाच्या अंड्यांचे ५२ दिवस संगोपन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे अंड्यातून ९३ कासवांच्या पिल्लांनी जन्म घेतला. या पिल्लांना सुखरूप पणे समुद्राच्या पाण्यात सोडण्यात आले. यावेळी प्रा. दप्तरदार, कांदळवन प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक पूजा लुटे, वनपाल सारीक फकीर, वनरक्षक निषाद साठे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा