जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
आयुष्यातिल नवदुर्गांचेस्थान अबाधित जाण जरा
त्यांच्या वाचुन तुला न थारा स्वीकारी हे सत्य जरा
“आई” वाचुनजन्म कुणाला देवाचे ते रूप खरे
“अज्जी” च्या मांडीवर गोष्टी,त्याविण शॆशव रे अपुरे
“बहिणी” चे प्रेम त्याग जणु मुक्ताईचा भास पुरा
“मॆत्रिणि” चा सहवास जीवनी चॆतन्याचा एक झरा
“पत्नी” चा अवतार आगळा सर्व देवता सांठविल्या
“सासू” दुसरी माय जयांनि कथा हिताच्या ऎकविल्या
“सून” अवतरे सोन पाउली गृही लक्ष्मिचा वास पहा
“कन्येचा” अधिकार स्थान,अन् डॊल घराची शान अहा
“नात” सांवली सार्यांची जणु दुर्गेचे ते रूप अहा
महाकालि,अन् महालक्ष्मी वा महासरस्वती यांत पहा
अरविंद