You are currently viewing नका मारू मला

नका मारू मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त लिहिलेली कविता

मला आई बाबा, नका मारू भावासाठी।
प्राण तळमळतो, तुमच्या भेटीसाठी।।

पोटी तुमच्या मी, येईल का मग पुन्हा।
काय माझी चूक आहे, मला सांगा माझा गुन्हा।।

जर ज्यास्त वाटली, तर करील मी चाकरी।
भांडे घाशील आईचे, तुम्हा खाऊ घालीन भाकरी।।

दादाला तुम्ही शिकवा, मला नको शाळा।
मुली विना आनंदाचा, फुलत नाही मळा।।

माझा गर्भपात करून, सुख कसे मिळणार।
लेक काय असते हे, तुम्हाला कसे कळणार।।

जर मला शिकवले तर, डॉक्टर मी पण होईल।
तुमच्या आयुष्याचे, स्वप्न पूर्ण होईल।।

तुमच्या दुःखामध्ये, सून साथ नाही देणार।
कितीही जीव लावला पण, ती लेक नाही होणार।।

भावासाठी बहिन, एक तरी हवी।
एका निमित्ताने तुम्ही, जाणार तिच्या गावी।।

निरोप तुमचा भेटता, मन आनंदून जाईल।
अशी मिठी मारील तुम्हा, मन गहिवरून येईल।।

लेकीसारखी काळजी, कोणी करत नाही।
मायेची उब तिच्या, कधी सरत नाही।।

नका गर्भपात करू, फक्त मुलासाठी।
मुलीसारखी संपत्ती, जगी नाही मोठी।।

रामदास आण्णा
गाव:मासरूळ जि. मातृतिर्थ बुलढाणा
©®चे सर्व अधिकार आरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा