You are currently viewing रुग्णसेवे बरोबर विविध विकास कामांसाठी सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महिंद्र सांगेलकर यांची संपर्कमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट

रुग्णसेवे बरोबर विविध विकास कामांसाठी सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महिंद्र सांगेलकर यांची संपर्कमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट

मुंबई –  प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यासह शहरातील रुग्णास सेवेकडे लक्ष देण्याची विनंती आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली आहे याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यमंत्री पाटील यांनी तालुकाध्यक्ष सांगेलकर यांना दिले
आजही आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना गोवा राज्यातील बांबुळी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो याशिवाय कोल्हापूर आणि बेळगाव कर्नाटक येथील रुग्णालयामध्ये रुग्णांना हलवावे लागत आहे त्यामुळे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात
दर्जेदार सुविधा मिळाव्यात म्हणजे रुग्णांची परवड संपेल अशी विनंती तालुकाध्यक्ष सांगोलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आह
त्यांनी आज 10 मार्चला काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की
, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाचे केंद्र मानले जाते. याठिकाणी खेडयापाडयातून सर्वसामान्य नागरिक, विविध आजारांवरती उपचार घेण्याकरिता अनेक वर्षे सावंतवाडीमध्ये ये-जा करीत असतात. याठिकाणी सोनोग्राफी मशिन उपलब्ध आहे, परंतु टेक्निशियन व तंत्रज्ञ उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरची औषधे जादा दराने खरेदी करावी लागतात. तसेच याठिकाणी रेडिओलॉजिस्ट व टेक्निशियन ही पदे तात्काळ भरावीत. याठिकाणी सिटीस्कॅन मशिन उपलब्ध व्हाव्यात जेणेकरुन 30 ते 40 कि.मी.च्या अंतरावर जर अपघात झाला किंवा डोक्याला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास विलाविलंब याठिकाणी तात्काळ उपचार होऊ शकतील. याठिकाणी 8000 विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. याठिकाणी स्त्रीरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजित चितारी व डॉ.वजराटकर इ. डॉक्टर्स सर्वसामान्य नागरिकांना दिवसरात्र चांगली सेवा देतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे आशेचा किरण वाटत असल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला शासन स्तरावरती विशेष दर्जा देवून जास्तीत जास्त दर्जेदार सोयीसुविधा आपल्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची विनंती सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे दरम्यान याप्रकरणी आपण गांभीर्याने लक्ष घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अधिकची रुग्णसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ही राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले

30 लाख रुपये निधी
सांगेली कुंभ्याचा व्हाळावर पुलासाठी मागणी

राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सांगेलकर यांनी गृहराज्यमंत्री
सतेज पाटील यांच्याकडे सावंतवाडी तालुक्यातील
सांगेली येथील कुंभ्याचा व्हाळावर पुल बांधण्याचे काम मंजुरीची मागणी केली आहे
सांगेली कुंभ्याचा व्हाळावर पुल नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचे तसेच शेतक-यांचे फारच हाल होतात. शेतकरी यांना आपल्या शेतीवर कामाकरिता जाता येत नाही. तसेच ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेवुन सदरचा व्हाळ ओलांडतात तरी सदरच्या व्हाळावर पुलाचे बांधकाम झाल्यास ग्रामस्थ्यांची व शेतक-यांची होणारी गैरसोय दुर होईल तरी आपल्या स्थानिक विकास निधीतुन किंवा प्राप्त होणा-या निधीतुन सांगेली कुंभ्याचा व्हाळावर पुल बांधणे कामाकरिता 30 लाख रुपये निधी मंजुर करण्याची मागणी सांगेलकर यांनी केली आहे

40 लाख रुपये निधी
सांगेली टेमकरवाडी ते खालचीवाडी व्हाळावरील पुल पुलासाठी मागणी

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महिंद्र सांगेलकर यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली त्यांना लेखी निवेदन सादर केले या लेखी निवेदनामध्ये सावंतवाडी तालुक्यातील सांगेली टेमकरवाडी ते खालचीवाडी व्हाळावरील पुल मंजुरीची मागणी केली आहे
सांगेली टेमकरवाडी ते खालचीवाडी रस्त्यावरिल व्हाळावर पुल नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचे तसेच शेतक-यांचे फारच हाल होतात. शेतकरी यांना आपल्या शेतीवर कामाकरिता जाता येत नाही. तसेच ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेवुन सदरचा व्हाळ ओलांडतात तरी सदरच्या व्हाळावर पुलाचे बांधकाम झाल्यास ग्रामस्थ्यांची व शेतक-यांची होणारी गैरसोय दुर होईल तरी आपल्या स्थानिक विकास निधीतुन किंवा प्राप्त होणा-या निधीतुन सांगेली टेमकरवाडी ते खालचीवाडी रस्त्यावरिल व्हाळावर पुल बांधणे कामाकरिता 40 लाख रुपये निधी मंजुर करण्याची विनंती सांगेलकर यांनी केली आहे यालाही नामदार अशोक चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

राज्याचे गृह, ग्रहनिर्माण, परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना निवेदन सादर करताना सावंतवाडी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

प्रतिक्रिया व्यक्त करा