बांदा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं.१ येथे महिला शिक्षिका व विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते केक कापून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या महिला दिन कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर शिक्षिका सरोज नाईक, पालक संघ उपाध्यक्ष राजन केणी , माता पालक संघ सदस्य नेहा सावंत, पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये आदी उपस्थित होते . यावेळी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅपटेनमध्ये स्थान मिळवलेल्या किमया संतोष परब व कनिष्का राजन केणी या विद्यार्थीनींचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर आरती देसाई यांनी किशोरवयीन मुला मुलींच्या समस्या व पालकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच नाबर शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांचे अवधान टिकून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. य
यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक पालक यांनी परीश्रम घेतले.