मनाच्या झोक्याला जिच्या मुळे गती
हिच्याच विना खुंटते मती
लाख मोलाची तीच जपते नाती
असतात जश्या समई च्या वाती
बदलत्या जगात बदलती नारी
लाख मोलाच्या संसाराला भारी
नांव संसाराची ,खोली सागराची
हिरवळ बागेची, दिशा प्रगतीची
समजून घ्यावे अस्तित्व, छळणे नको
बरोबरीची फुशारकी उगाच मारणे नको
लावून अंदाज गर्भातच मारणे नको
आता राखीवतेचे नाटक वठवणे नको
हे थांबवा आता, ठिकाणी ठेवा माथा
बरोबरी साधेल गुण तिचे पहाता
रणचंडिका हि अनंत काळाची माता
का असे राहता ? तिला न जाणता ?
(🌹महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 )