You are currently viewing हुलप

हुलप

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना

अपार वेदनेची
ती झळाले वेदना
उन्मत्त मृगजळ
सलते संवेदना

राज्य दैत्य शुलाचे
शब्दधार हुलप
रक्तधार तुषार
कोठे लावू कलप ?

विस्कटलेले शब्द
कसे होऊ तन्मय ?
मस्तकी लाख भाले
रडे शब्द चिन्मय

लाल रक्ती नयनी
सांड महाप्रलय
जळे मन ह्दयी
वात तेजोवलय

मनात तो संग्राम
कोणा करु प्रणाम?
तोल जाई विचार
शब्द दुष्परिणाम

येथे रावणी जथ्थे
दुष्ट ते कारभारी
निशीदिन चालते
राक्षसी साठमारी

हुलप :आगीचा डोंब

© मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा