You are currently viewing जि. प. केंद्र शाळा परुळे नंबर 3 येथे डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप

जि. प. केंद्र शाळा परुळे नंबर 3 येथे डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्ला / प्रतिनिधी :

 

कै संतोष जयवंत नेवालकर मित्रमंडळ मुंबई (टीम संत्या) यांजमार्फत जि. प. केंद्र शाळा परुळे नं. 3 येथे डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. परुळे गावचे कै संतोष नेवालकर यांच्या स्मृतिनिमिताने त्यांच्या मित्र परिवाराने सामजिक उपक्रम सुरु केले आहेत. त्यांच्या प्रेरणेतून या मित्र परिवाराची वाटचाल सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कै संतोष याच्या परुळे गावतील शाळेला शिक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी टिम संत्या चे सदस्य अजय कदम, अजय जंगम, अर्थव कदम, हेमंत शिर्के, बाळकृष्ण शिवगन्, यतीश टेंगसाल, जयेन्द्र जाधव्, महेन्द्र पाटिल, सचिन पटेल, विवेक तावड़े, सचिन राऊळ, सचिन पेड़नेकर्, दीपक नाईक, सुहास नेवालकर, सुभाष वेंगुर्लकर, सुनील वेंगुर्लकर, संतोष पाटकर, गणेश तावडे असा मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यकम प्रसंगी शाळा व्यवस्थापन विलास गवंडे, मोहन वाड्येकर, गुंडू नेवालकर, माजी शिक्षक हनुमंत तेली, सानिका परुळेकर, मुुख्याध्यपक समीर चव्हाण, शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेसाठी संगनक संच, खेळाचे साहित्य, अंड्राइड टीव्ही व मुलाना शैक्षिणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्व दात्यांचे शाळेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा