You are currently viewing संवाद मीडियाच्या बातमीनंतर कोलगाव येथील जुगार बंद

संवाद मीडियाच्या बातमीनंतर कोलगाव येथील जुगार बंद

*वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली संवाद मीडियाच्या बातमीची दखल*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगारात बाबत संवाद मीडिया जागरुकतेने बातम्या देत असतो. जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रिकेटचे सामने व दशावतारी नाटके यांच्या आडून जुगार खेळले जातात. गावा गावातील नागरिकांनी संवाद मीडियावर विश्वास ठेवून जुगाराच्या विरोधात संवाद मीडिया वारंवार देत असलेल्या बातम्यांमुळे फोन करून गावागावातील जुगाराच्या बातम्या संवाद मीडिया पर्यंत पोहोचवत असतात. संवाद मीडियाने कोलगाव येथे दशावतारी नाटक व क्रिकेट सामन्यांच्या आडून सुरू असलेल्या जुगारा वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करत बातमी दिली होती. सदर बातमीची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली व कोलगाव येथे सुरू असलेला जुगार बंद पडला. आयर्न मॅन आणि एक असे दोघे जण पट मारत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील जुगार अड्ड्यांवर क्रिकेट खेळणारी तरुण मंडळी व रात्रीच्या वेळी दशावतारी नाटकाला जातो असे सांगून येणारे तरुण, पैसे मिळतील या हव्यासापोटी जुगाराच्या पटावर बसतात. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणही जुगारासारख्या अवैद्य धंद्यांच्या नादी लागून आयुष्याची बरबादी करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगाराची योग्य वेळी दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा