सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावा-गावात दशावतारी नाटके आणि क्रिकेटचे सामने आयोजित केले जात असून या दशावतारी नाटकांच्या आडून जुगारी लोक जुगाराच्या मैफिली सजवत आहेत. खाकी वर्दीच्या आशीर्वादाने आणि त्या एरियातील स्थानिक अंमलदार यांच्या कृपेने जुगाराचे फड बसवले जातात. सावंतवाडी तालुक्यात एका मंदिराच्या वरच्या बाजूस जुगाराची मैफिल सजली होती. माजलगाव येथील जुगाराच्या पटांवर मोठी उलाढाल झाल्याने दुसऱ्या जागेचा शोध सुरू असल्याची खात्रीशीर बातमी आली आणि ती खरी ठरली. बीट अंमलदारांच्या आशीर्वादाने कोलगाव येथील “महाभारत सांगणारा नवारांचा मृत्युंजय” याने माजलगाव येथे जुगाराची मैफिल सजवली होती. गावागावात बसणाऱ्या जुगाराच्या मैफिली मुळे तरुण मुले अवैद्य धंदे, जुगार यांच्या नादी लागून पैशाच्या हव्यासापोटी आयुष्याची बरबादी करत आहेत. नवारांच्या मृत्युंजय ने कोलगाव येथे बैठक कालपासून सुरु केली आहे. अंमलदार व एल सी बी चे पाव पाव बढाये आरपार कर जा नावाच्या खाकीच्या रखवालदारांना हाताशी धरत नवारांच्या मृत्युंजय ने कोलगाव येथे जुगाराच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालणे? हे खाकी वर्दीचे काम असताना खाकी वर्दीच्या आशीर्वादावर जिल्ह्यातील अवैध धंदे फोफावले असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात क्रिकेट सामने, दशावतारी नाटके सुरू आहेत त्याठिकाणी जातिनिशी लक्ष देऊन सुरू असणाऱ्या जुगार आदी अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी व ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अंमलदार यांना समज द्यावीअशी मागणी सर्वसामान्य लोकांकडून पुढे येत आहे.
कुणाच्या आशीर्वादाने कोलगाव येथे जुगाराची मैफील?
- Post published:मार्च 4, 2022
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments