*जागतिक साहित्य कला व्यक्तीत्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संगीतकार, गायक अरुण गांगल यांची “श्री महाराजांच्या पादुका स्थापना तप पूर्ती सोहळा” जांभिवली” निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना.*
ब्रह्मचैतन्यांच्या पादुका झाल्या स्थापन
तपपूर्ती सोहळा आज होत संपन्न।।ध्रु।।
पादुका आणल्या हत्तर्गी गावांहून
जांभिवली आल्या गोंदवले पूजा होऊन
तपा पूर्वी स्थापिल्या श्रीमहाराजांच्या इच्छेनं।।1।।
पादुकांत नऊ नद्यांचे जल, हनुमान
महाराजांचे गादीचा कापूस मणी रत्न
गोंदवले पंचांचे शुभहस्ते स्थानापन्न।।2।।
सेवेकरी करतात नित्य पूजा अर्चन
पौर्णिमेला होते काकड आरती संपन्न
रामरक्षा रामपाठ सायंपुजा होते नेमानं।।3।।
प्रतिवर्षी होते नाम शिबीर संपन्न
भक्त जमती मोदे घेती नाम समजून
उत्साहे होत भजन प्रवचन कीर्तन।।4।।
प्रति वर्षी होतो महाराजांचा जन्मदिन
पालखीपुढे रांगोळ्या काढती,होते भजन
सुवासिनी ओवाळती श्रींना,गावची शान।।5।।
नाम शिबिरात सहभागी होती सर्वजण
तृप्त होती अल्पोपहार प्रसाद मिळून
श्रींचे आशीर्वादे सोहळा होई संपन्न।।6।।