You are currently viewing उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाऱ्या कोव्हिडं डेडीकेटेड केअर सेंटरला योग्य सुविधा पुरवा….

उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणाऱ्या कोव्हिडं डेडीकेटेड केअर सेंटरला योग्य सुविधा पुरवा….

मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी….

सावंतवाडी :

उपजिल्हा रुग्णालयात जे 20 बेडचे कोव्हिडं डेडीकेटेड केअर सेंटर सुरू केले जात आहे. त्यात कोरोना रुग्णाची हेळसांड होऊ नये, त्यांना सकस आहार दिला जावा, रुग्णालयात असणारी स्वच्छता गृहे तसेच आजुबाजूच्या परिसरात स्वछता ठेवली जावी, कोरोनाचे उपचार घेणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांना शवागरात ठेवण्यात यावे त्याची टेस्ट करून त्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यावा, या कोव्हिडं सेंटर मध्ये कार्यरत असणारे डॉक्टर, कर्मचारी, स्वछता कर्मचारी आरोग्य अधिकारी याना सिव्हिल वोर्ड मध्ये उपचार देण्यासाठी नियुक्त केले जाऊ नये अशी विविध प्रकारची मागणी मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा