वेंगुर्ले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सायंकाळी ४ = ०० वाजता साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे ” होममिनीस्टर – खेळ पैठणीचा “या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असुन प्रथम पारितोषिक पैठणी तसेच इतरांना सोन्याची नथ व गृहपयोगी वस्तु बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत .
महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.तसेच ” चुल व मुल “या कक्षेतुन बाहेर पडुन महीलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपा महिला मोर्चा , वेंगुर्ले च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी सांगितले .
महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला मोर्चा जि. सरचिटणीस सारीका काळसेकर , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे , नगरसेविका कृपा मोंडकर , ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी परब व गार्गी राऊळ , किर्तीमंगल भगत , रसीका मठकर व आकांक्षा परब इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .