You are currently viewing शिक्षणाधिकारी आणि इतर ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

शिक्षणाधिकारी आणि इतर ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

सिंधुदुर्ग जि. प. च्या शिक्षणाधिकारी पदी महेश सं.धोत्रे यांची नियुक्ती..

राज्याच्या शिक्षण क्रीडा विभागाच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी आणि तत्सम ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश शिक्षण विभागाचे उपसचिव ति.वा करपे यांनी काढले आहेत.

जिल्हा परिषदेच्या नव्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश सं.धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे. लवकरच ते या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली कोल्हापूर येथे झाल्यानंतर या पदाचा कार्यभार नव्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी आलेले मुस्ताक शेख यांच्याकडे सोपविन्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून रिक्त पदावर नव्याने शिक्षणाधिकारी मिळावे, यासाठी सातत्याने मागणी सुरू होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे शिक्षणाधिकारी पदी महेश सं.धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे.

महेश धोत्रे हे सांगली येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. शासनाच्या २३ फेब्रुवारी च्या एका काढलेल्या आदेशात कोकण विभागासह अन्य विभागातील शिक्षणाधिकारी आणि तत्सम प्रवर्गाच्या रिक्त जागांवर पदोन्नती देण्याचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून महेश धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच धोत्रे हे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा