धर्म या संकल्पनेत राष्ट्राला स्थान काय ?
धर्मा संबंधी गीतेमध्ये खालील प्रमाणे म्हटलेले आहे.
” *सर्व धर्मानपरित्यज्ज माम एकम् शरणम् व्रज “*
येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, जेव्हा भगवतगीता सांगितली गेली तेव्हा आज प्रचलित असलेल्या धर्मापैकी कुठलाही धर्म अस्तित्वात नव्हता. याचाच भावार्थ असा की, धर्म या शब्दाचा अर्थ वेगळा आहे व तो म्हणजे मार्ग, उपासना मार्ग हा होय. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ” देवाच्या प्राप्तीचे सर्व उपासनामार्ग सोडून मला शरण येण्याचा मार्ग धर,” थोडक्यात, भारतीय संस्कृतीत धर्म हा प्रकार नसून उपासना मार्ग हाच प्रकार आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीचे विविध लोक विविध प्रकारच्या उपासना करीत असतात, हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी ज्याला उपासना मार्ग आवडेल तो त्याने धरावा व त्यासाठी भारतीय संस्कृतीत त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. परंतु कर्तव्यधर्मरुपी हिऱ्याचा सर्वात श्रेष्ठ व महत्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रधर्म हा होय, अशी जीवनविद्येची धारणा आहे. या दृष्टीने विचार करता राष्ट्र हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. ( *क्रमशः..*)
*–सद्गुरू श्री वामनराव पै.*