You are currently viewing जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामांचा प्रश्न अखेर मार्गी 

जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामांचा प्रश्न अखेर मार्गी 

डोंगरी भागासाठी १२ लाख ३० हजार तर बिगर डोंगरी भागासाठी ११ लाख २५ हजार खर्च करण्यास मंजुरी

सिंधुदुर्ग.

जि.प. बांधकाम समितीची सभा गुरुवारी समिती सभागृहात संपन्न झाली. या सभेत अंगणवाडी बांधकामासाठी आता ८ लाख ५० हजार रुपये खर्चाची मर्यादा वाढवून शासनाने १२ लाख ५० हजार रुपये केल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी बांधकामांचा प्रश्न मार्गी लागला आहे. अशी माहिती गुरुवारी झालेल्या बांधकाम समिती सभेत सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली.

यावेळी सभेत समिती सदस्य प्रदीप नारकर, राजेंद्र मुळे, राजेश कविटकर आदी सदस्य अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात अंगणवाडी बांधकामासाठी ८ लाख ५० हजार रुपये खर्चाची मर्यादा होती. मात्र या रकमेत अंगणवाडी इमारतीचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याने याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविल्या होता. त्यानुसार डोंगरी भागासाठी १२ लाख ३० हजार बिगर डोंगरी भागासाठी ११ लाख २५ हजार खर्च करण्यास मंजुरी दिल्याने आता अंगणवाडी इमारतींच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सभापती महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, बांधकाम विभागाचे मूळ अंदाजपत्र ५ कोटी ६९ लाखाचे होते. त्यात २० लाख वाढवून ते ५ कोटी ८९ लाख करण्यात आले आहे.

तसेच पुरहानी झालेल्या रस्ताची कामे रखडल्याबद्दल प्रदिप नारकर यांनी लक्ष वेधत जिल्हातील काही रस्ते खुपच नादुरुस्त झाले आहेत. देवगड मधील मालपे हा रस्ता खड्डेमय झाला असून प्राधान्याने लक्ष घालावे अशीही मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा