*शिक्षक भारतीची उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि अधिक्षक यांच्याबरोबर निर्णायक तोडगा..*
तळेरे: प्रतिनिधी
एनपीएस संदर्भात बाॅडपेपरवर द्यावे लागणारे हमीपत्रासाठी एकमहीन्याची सवलत शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी दिली असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.
जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर,डिसिपीएस सेलचे अध्यक्ष गिरीश गोसावी, कुणाल बांदेकर,राजेश राठ्ये….आदी पदाधिका-यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख,वेतन विभागाच्या श्रीम . नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी एनपीएस व डीपीएस या विषयावर सविस्तर चर्चा करुन तोडगा काढला आहे.त्यामूळे ज्या शाळांनी अद्याप ही फेब्रुवारीची बिले सादर केली नसतील तर त्यांनी त्वरित बीले वेतन विभागात पाठवून द्यावीत असे आवाहन शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केले आहे.
आज बांधकाम सभापती महेद्र चव्हाण यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सक्तीने हमीपत्र द्यावे अन्यथा पगार थांबविण्याचे निर्णय एक महिन्यासाठी स्थगित करत असल्याचे शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधिक्षक श्रीम.नाईकमॅडम यांनी आश्वासन दिल्याने फेब्रुवारीचा रखडणारा पगार विनाविलंब होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
*पगार न थांबविण्याचे शिक्षण उपसंचालक यांचेही आश्वासन*
दरम्यान याच विषयासाठी शिक्षण उपसंचालक श्री महेश चोथे यांना पुणे विभागीय शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री दादासाहेब लाड आणि कोल्हापूर शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री काकासाहेब भोकरे आणि शिक्षक भारतीचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन चर्चा केली त्यावेळी उपसंचालक यांनी पगार बिले न थांबवण्याचे आश्वासन दिले.
**********************
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्या आक्रमक भूमिकेमुळे व विशेष प्रयत्नांमुळे किमान एक महिना तरी पठाराला विलंब होण्याचे संकट टळले आहे.
दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने नवीन पेन्शन योजना (DCPS/NPS) लागू करण्याचा निर्णय घेतला. अद्यापही सदर योजनेविषयी शासनस्तरावर अंतिम निर्णय झालेला नसताना १०० रु.च्या स्टॅपवर हमीपत्राची अट घालून वेतन बीले न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो आमच्या शाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे.असे माध्यमिक शिक्षणाधिकारी या दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करून,कोणत्याही शासन निर्णयामध्ये अथवा परिपत्रक/पत्रामध्ये वेतन बीले स्विकारू नयेत असा नामोल्लेखही नसताना आपल्या जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडावा. हे केवळ दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली होती.
वेतन बिले न स्वीकारणे ही बाब गंभीर असून तातडीने त्यासंबंधीची उचित कार्यवाही व्हावी अशी लेखी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केली आहे.