*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांची अप्रतिम काव्यरचना*
*शीर्षक – मीच तो सैनिक(स्वतः)*
लोकांना पाहून मला, खंत वाटे मनी।
स्वप्न पूर्ण होईल, माझे कोणत्या क्षणी।।
शाळा, शिक्षण आणि, हाती घेतले काम।
मला सैनिक व्हायचा, निर्णय केला ठाम।।
स्वप्नात कोणी अचानक, बसावं जसं उठून।
मी माझ्या मनामध्ये, तसाच उठलो पेटून।।
मग सुरू झाली माझी, कुजबुज घरी।
माझी दशा पाहुन, हसत होत्या पोरी।।
मला हिणवले त्यांनी, नाही आला राग।
पण माझ्या काळजात, पेटली होती आग।।
जणू बुरुजाला कोणी, पाडावी एक खिंड।
मला माझ्या विचाराने, करून टाकले थंड।।
सैनिक होण्यासाठी, धावलो अनवाणी।।
रक्ताचं घाम गाळून, तितकं सांडलं पाणी।।
सैनिक झालो मी, पूर्ण झाली जिद्द।
मेहनतीने माझ्या, केले स्वप्न सिद्ध।।
मीच तो सैनिक, जो देशासाठी लढतो।
हसत घरून निघतो, आणी एकट्यात रडतो।।
वर्दीकडे पाहून दुःख, विसरून जातो सगळे।
तुमच्यात आणि माझ्यात, हेच आहे वेगळे।।
रामदास आण्णा
गाव:मासरूळ जि. बुलढाणा
7987786373