*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना*
*मस्त*
तुझ्या ब्युटीने झाले
काळीज माझे फस्त
लव्हचा भूकंप काळजात
तू दिसतेस एकदम मस्त..
तूझाच फोटो भरला
या डोळ्यात जबरदस्त
लाईफला स्वर्ग बनवणारी
तू दिसतेस एकदम मस्त..
एटीट्युड माझा झाला
तुझ्या ब्युटीमुळे स्वस्त
काळजाचे चुंबक आहेस
तू दिसतेस एकदम मस्त..
दुसऱ्या मुलींसोबत आता
मी राहतच नाही व्यस्त
ब्युटीचा अणुबॉम्ब फोडणारी
तू दिसतेस एकदम मस्त..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई