बाळ कनयाळकर म्हणजेच हरी जगन्नाथ कनयाळकर, मूळ रेडी कनयाळ या गावचे सुपुत्र असलेले बाळ कनयाळकर हे पत्नी कै.सौ. सुचिता हरी कनयाळकर यांच्या नोकरी निमित्त कुडाळ येथील माघी गणेश कॉलनी मध्ये स्थायिक झाले. आपल्या संसाराला सुरुवात करता करता सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा युनियनचे अध्यक्ष म्हणून कार्य करू लागले. मूळचा समाजकारण पिंड असणारे बाळ कनयाळकर समाजकारण आणि राजकारणात पारंगत झाले.
आपल्या राजकीय प्रवासात कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे कार्य जोमाने सुरू केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये स्थान मिळाल्यानंतर खासदार मेजर सुधीर सावंत यांच्या समवेत काम करताना सावंत यांचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. याच ओळखीचा उपयोग करता पिंगुळी पंचायत समितीचे तिकीट मिळाल्यावर कुडाळ तालुक्यामध्ये 1992 मध्ये पंचायत समिती सदस्य पदी विराजमान झाले. तसेच कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली.
काँग्रेस पक्ष फुटला आणि शरद पवार साहेबांनी स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष काढला. मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. जिल्ह्यात काही ठराविक कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत करण्याची जबाबदारी बाळ कनयाळकर यांच्यावर आली. सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव, सुरेश सुद्रिक, सुरेश दळवी, दीपक केसरकर, यांच्यासमवेत जिल्ह्यात नंबर 1 ला राष्ट्रवादी नेण्यासाठी कनयाळकर यांनी खारीचा वाटा उचलला. सलग बारा वर्षे त्यांनी कुडाळ तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली व याच काळात सलग दोन वेळा कुडाळ पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्याचे यश संपादन केले. याकरिता मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी तर कधी शिवसेना-राष्ट्रवादी अशा पद्धतीने इतर पक्षाची सहसंबंध प्रस्थापित करून कुडाळ पंचायत समिती मध्ये जोमाने काम केले.
नंतरच्या काळात विक्टर डान्टस, सुरेश गवस आणि सध्याचे विद्यमान अध्यक्ष श्री.अमित सामंत यांच्यासमवेत काम करताना याच कालखंडात एक दुःखद घटना म्हणजे त्यांच्या पत्नीचे निधन झाले…आपल्या पत्नीच्या निधना नंतर सुद्धा दुःख विसरून खंबीरपणे आपल्या कुटुंबाला साथ देता देता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा दृष्टीने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. बाळ कनयाळकर यांच्या सर्व कार्याचा आढावा घेता त्यांची जिल्हा नियोजन मंडळावर नियुक्ती करण्यात आली.
आपल्या राजकीय प्रवासात कनयाळकर यांनी सर्वच राजकीय पक्षांतील व्यक्तींशी चांगले संबंध प्रस्थापित करणारी व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
अलीकडे बदल्याचे राजकारण सुरू असताना आणि राजकारणात एकमेकांवर चिखलफेक होत असतानाही बाळ कनयाळकर हे प्रगल्भ राजकारणी म्हणून समोर आले. अशा या राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस.
*”संवाद मिडियाकडून” बाळ कनयाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….*