You are currently viewing तळेरे हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

तळेरे हायस्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शिवजयंती निमित्त तळेरे हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रम

शिवजयंती निमित्त वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . प्रमुख अतिथी विश्रांती कोयंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शरदजी वायंगणकर , प्रमोद कोयंडे, प्र. मुख्याध्यापक ए.एस. मांजरेकर , डी. सी. तळेकर , एन.बी. तडवी , ए.बी. कानकेकर , पी. एन.काणेकर , पी.एम. पाटील , ए. पी. कोकरे , व्ही. डी. टाकळे, ए.तांबे, शिक्षकेतर कर्मचारी देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर , पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच बाल शिवाजी आणि जिजामातांच्या जयघोषात झालेल्या एंट्रीने उस्थितांची मने जिंकली . प्रवेशानंतर छत्रपतींच्या जयघोषाने विद्यार्थ्यांनीं परिसर दणाणून सोडला . इयत्ता सहावीतील विद्यार्थी स्वयम महाडीक याने बाल शिवाजींची आणि दहावीतील विद्यार्थींनीं परी जाधव हिने जिजाऊ मातेची भूमिका साकारली होती. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज , संत तुकाराम महाराज यांची भेट व वारकरी दींडी लक्षवेधी ठरली . इयत्ता सातवीआठवीतील विद्यार्थीनींनी किल्ला मराठी मुलखाचा हे गाणे तर अगांवर शहारे आणणारा पोवाडा अकरावीतील विद्यार्थी देवेन दुंखडे याने सादर केला . याना संगीत साथ तन्मय कदम , आर्या घाडी , यांनी दिली
तसेच एकच राजा इथे जन्मला , माय भवानी अशी समूहनृत्य ओव्या असे एकापेक्षा एक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले . इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनीं शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा केलेला वध या छोटेखानी नाटिकेने तेव्हाचा थरार सर्वासमोर उभा केला . कार्यक्रमासाठी पी. एन. काणेकर , व्ही . केसरकर , एन.गावठे , व्ही टाकळे यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता अकृरावीची विद्यार्थीनीं दिया कांबळे हिने केलेले शिवव्याख्यान व सद्य स्थितीतील परिस्थिती यावर केलेले भाष्य विचार करायला भाग पडणारे आहे . इयत्ता पाचवीमधील सिद्धी बोडके , वेद शेळके , शमिका ढेकणे यांनीही भाषणातून छत्रपतींच्या पराक्रम , चिकाटी , चातुर्य , संघटन, संयम याबद्दल विचार मांडले .


कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद वायंगणकर म्हणाले छत्रपती शिवाजी महारांची थोरवी फार मोठी आहे . ते फक्त एका राज्याचे नव्हते तर संपूर्ण राष्ट्राचे होते. शिवजयंती निमित्त कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना
खाली केलेल्या एकापेक्षा एक सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले . प्रमुख अतिथी कोयंडे यांनीही एक गाणे सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले .याप्रसंगी प्रमोद कोयंडे यानींही छत्रपतीचे गुणविशेष आपल्या मनोगतातून मांडले प्रास्ताविक ए.एस मांजरेकर , सूत्रसंचालन ए बी कानकेकर , अकरावीची विद्यार्थीनीं सीमा धावडे तर आभार अकरावी चा विद्यार्थी विराज नांदलस्कर याने मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा