जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा अप्रतिम अभंग
ठोसर घराणे ! राणूबाई माता !
सूर्याजीच्या सुता ! नारायणा !!१!!
रामनवमीला ! अवतार झाला !
भक्त प्रकटला ! जांब गावी !!२!!
लग्नमंडपात ! सावधान शब्द !
बदले प्रारब्ध ! क्षणार्धात !!३!!
दीर्घ तपश्चर्या ! आत्मसाक्षात्कार !
राम नाम सार ! रामदास !!४!!
विरश्री गर्जना ! भगवंत भक्ती !
कार्याची महती ! जागविली !!५!!
दासबोध ग्रंथी ! करुणाष्टकात !
मनाच्या श्लोकात ! प्रबोधन !!६!!
अकरा मारुती ! करूनी स्थापना !
शक्ति उपासना ! वाढवली !!७!!
राष्ट्र उभारणी ! विवेकी सत्कर्म !
महाराष्ट्र धर्म ! वाढवावा !!८!!
आरत्या देवाच्या ! भीमरूपी स्तोत्र !
भक्ती शक्ती स्तोत्र ! दृढ केले !!९!!
दासनवमीला ! अध्याय संपले !
समर्पित झाले ! रामाठायी !!१०!!
ज्योत्स्ना तानवडे.
वारजे, पुणे.५८