शिरोड्यातील मयू मारतो पट….वरिष्ठ अंधारात
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून आज जगात 30 नंबर वर आला. पर्यटनात नावारूपास आलेला सिंधुदुर्ग जिल्हा अवैद्य धंदे यांसाठी सुद्धा ओळखला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू,मटका, आणि जुगार जोरदार सुरू असतात. स्थानिक खाकी यंत्रणेला हाताशी धरून जुगारी मोठ्या प्रमाणात जुगाराच्या मैफिली सजवतात. बांदा पंचक्रोशीत दशावतारी नाटके तसेच अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आडून जुगार बसविले जात होते. संवाद मीडियाच्या बातमीनंतर बांदा जवळील अ-डुले गावातील जुगाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या गावात जाऊन पेट्रोलिंग सुरू केलं, त्यामुळे दशावतारी नाटकाच्या वेळी ठरलेल्या जुगाराच्या मैफिली काही वेळ थांबवून रात्री उशिरा सुरू करण्यात आल्या. रात्री उशिरा जवळपास एक वाजता नाटक संपले, त्यानंतर शिरोडा नाव लावलेला मयू नामक जुगारी याने रात्री एक वाजता जुगाराच्या मैफिलींना सुरुवात केली. बांदा जवळील डोंगर पायथ्याशी असलेल्या (क)रमळे येथे रात्री दहा वाजता दशावतारी नाटक सुरू झाले आहे. आज सुरू झालेल्या दशावतारी नाटकाच्या ठिकाणी बांदा पंचक्रोशीतील शिरोड्याच्या मयू म्हणून प्रसिद्ध असणारा स्थानिक जुगारी याने स्थानिक खाकीला हाताशी धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवत जुगाराचे मोठी मैफिल बसविण्याचे नियोजन केले आहे. (क)रमळे येथील या जुगाराच्या मैफिली साठी गोवा येथून मोठ्या प्रमाणात जुगारी आले आहेत. स्थानिक पोलिसांनी याची दखल न घेतल्यास आज रात्री नक्कीच मोठ्या प्रमाणात उलाढाल होणारा जुगार (क)रमळे येथे बसविला जाणार असल्याची खात्रीशीर बातमी आहे. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील काही ठिकाणी सुरू असणाऱ्या क्रिकेट सामने व रात्रीच्या वेळी ची दशावतारी नाटके यांच्याआडून सुरू होणाऱ्या जुगार यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. संवाद मीडिया वेळोवेळी जिल्ह्यात सुरू असणारे जुगार मटका दारू सारखी अवैद्य धंदे यांच्याविरोधात आवाज उठवत असतो आणि जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक देखील त्याची दखल घेत असतात.