समर्पित सेवाभावी कार्यकर्ते आबा शिरसाट यांचे निधन….
आजची सोमवारची सकाळ अस्वस्थ करणारी.सकाळीच माझे पत्रकार मित्र शेखर सामंत यांचा मेसेज आला,” आबा शिरसाट यांचे कोल्हापूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन”…बातमी वाचून अगदी निःशब्द झालो आणि अवघ्या तासाभरात माझे पिंगुळीचे मित्र संग्राम खानोलकर यांचा मेसेज, “कमलाकांत प्रभू यांचे निधन”…दोन्ही बातम्या वेदना देणाऱ्या. दोघेही भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते.
आबा शिरसाट हे नांव गेली कित्येक वर्षे सगळ्यानाचं सुपरिचित. त्यांचा मुलगा मंदार शिरसाट हा गेल्या दहा वर्षात माझ्या संपर्कात. एक यशस्वी उद्योजक आणि शिवसेनेचा जिल्ह्यातील युवा चेहरा..पण आबांचा आणि माझा परिचय हा सुमारे गेल्या पस्तीस वर्षांचा. जेव्हा भाजपा हा या जिल्ह्यात अस्पृश्य होता तेव्हा कुडाळमध्ये भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन मैदानात उतरणारे आबा होते. पक्षाचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही कार्यक्रम वा आंदोलन असेल तर आंबाचं सक्रीय योगदान असायचं.
आबा मला कधीही भेटले कि आंबाची त्यांनीच सर्वदूर पोहचवलेली Tagline जोरात म्हणून दाखवायचो…”जिंकलो तरी हरलो तरी”… आबा त्यावेळच्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे रहायचे. अर्थात त्या काळात पक्षाची ताकद सोसो..पण आबा निर्धाराने लढायचे.खरं तर कुडाळचे काही स्थानिक प्रश्न ते नेहमीच ऐरणीवर आणायचे. शहरातील स्वच्छता, पाणिपुरवठा या नागरिकांच्या दैनंदिन समस्येवर नेहमीच आवाज करायचे..
त्यांच्या निवडणूक प्रचाराचा एक वेगळाचं फंडा असायचा.त्या काळात आतासारखे फ्लेक्स नव्हते.का पडी फलक रंगवून लालायचे…आणि त्यावर टँग लाईन असायची…हरलो तरी जि़कलो तरी…हे अर्धवट वाक्य मग लोक पूर्ण करायचे…”हरलो तरी आणि जिंकलो तरी सदैव जनसेवेसाठी तत्पर…कुडाळातील अनेक आध्यात्मिक कार्यक्रमातही त्यांचा वावर असे.
मला एक किस्सा आठवतो…मा.माजी आमदार अशोकराव मोडक यांची पदवीधरची दुसरी निवडणूक
होती त्या निवडणुकीत मी सक्रीय होतो.अशोकराव हाँटेल यशोधरामध्ये होते.मी पण त्यांच्यासोबत होतो.माझी आंघोळ वगैरे आटोपल्यावर मी खाली आलो.मोडक सरा़च आवरेपर्यत यशोधराचे मालक आदरणीय राऊळबाबा यांच्याशी गप्पा मारायच्या एवढ्यात तेथे आबा आले..आम्ही चहा घेत होतो..आणि कुडाळातील स्थानिक पत्रकार मोडक सराना भेटायला आले.मी म्हटल ते आंघोळ करत आहेत. आटोपल्यावर भेटतील. त्यांना आमदार मोडक सरांची मुलाखत घ्यायची होती. एवढ्यात आबा त्या पत्रकार मित्राला म्हणाले..”तू जरा वेळानं ये..त़ेची नुसती आंघोळच नाय..आपले सगळे कपडेपण धुतले..यावर त्या पत्रकार मित्राला आश्चर्य वाटल…आमदार कपडे धुता..त्याला आबा चेष्टा करतात असं वाटल..तेव्हा चक्क आबा त्याला घेऊन वर.गेले..तर मोडकसर कपडे धूत होते..हे त्या पत्रकाराने पाहिल…आणि दुसऱ्या दिवशी ती पेपरची बातमी झाली… अर्थात मोडक सरांच्या साध्या राहाणीमानाचा तो भाग होता… एखाद्या माणसाबद्दलचा ठाम विश्वास आबाना असायचा..चेहरे ओळखण्यात ते माहिर होते.
आबांच्या आठवणी अनेक आहेत…माझी मोठी मुलगी स्नेहलच्या स्वागत सोहळ्याच्या वेळी त्यांना अचानक कोल्हापूरला जाव लागल म्हणून रात्रौ बारा वाजता फोन केला..खूप प्रयत्न केला पण आता येवू शकत नाही.. स्नेहलाकं आमचो आशिर्वाद सांगा…
मला वाटत चार वर्षापूर्वी मंदारचं लग्न होत..लग्ना अगोदर कुडाळात भेट झाली..म्हणाले,मंदारान पत्रिका दिली मां…लग्नाकं येवचा हां…मी म्हटल हो आठ दिवसापूर्वीच पत्रिका मिळाली.लग्नाला मी,माझे मित्र मोहन होडावडेकर व श्री अनिल कुलकर्णी असे एकत्रच गेलो होतो…आम्हाला सगळ्याना बघितल्यावर म्हणाले…आता कसा भरलेला वाटला…अतिशय आदराने वागणारे,विचारांवर निष्ठा असणारे,एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात झोकून देवून काम करणारे आमचे जेष्ठ मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले.त्यांच्या जाण्याने तमाम कुडाळ वासियांचे नुकसान झालेच पण सर्वसामान्यांनाही पोरकं झाल्याची भावना आहे.
अटल आणि स्नेहप्रिया परिवाराकडून आबाना भावपूर्ण आदरांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
..शोकाकुल…
अँड.नकुल पार्सेकर.