इर्शाद शेख फाउंडेशन, आरवली विकास मंडळ, वेंगुर्ला तालुका काँग्रेस, डेरवण वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
इर्शाद शेख फाउंडेशन, वेंगुर्ला आरवली विकास मंडळ संचलित, आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र वेंगुर्ला तालुका काँग्रेस भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने 03 मार्च रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात अस्थिरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, एमडी, मेडिसिन, नेत्ररोग तज्ञ उपस्थित असणार आहेत. भ.क.ल. वालावलकर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे उपस्थित तज्ञ डॉक्टर्स यावेळी आपली सेवा देणार आहेत.
अस्थिरोग तज्ञ – मणक्याचे, कमरेचे, मानेचे तसेच हाडांचे कोणतेही आजार
स्त्रीरोगतज्ञ – मासिक पाळीचे आजार, स्तनातील गाठीची तपासणी तसेच महिलांचे इतर आजार
एमडी मेडिसिन – मधुमेह हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, तसेच इतर तत्सम आजार
नेत्ररोग तज्ञ – डोळे तपासणी व मोतिबिंदू परीक्षण (चष्म्याचे नंबर काढून दिले जाणार नाहीत)
कॅन्सर तसेच दुर्धर आजाराची तपासणी केली जाईल. डेरवण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत रक्त तपासणी तसेच मोफत ईसीजी तपासणी केली जाईल. शिबिरात येताना अगोदरच्या औषधांची फाईल व जुने तपासणे रिपोर्ट घेऊन यावेत.
रुग्णांनी नोंदणी खालील नंबर वर नोंदणी करावी. आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र
फोन नंबर 02366 -227232
अधिक माहितीसाठी संपर्क- इर्शाद शेख फाउंडेशन 9404598091
दिनांक 03 मार्च रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 03 वाजेपर्यंत तपासणी होईल.
ठिकाण – आरवली वैद्यकीय आणि संशोधन केंद्र, आरवली ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग
जास्तीत जास्त रुग्णानी या मोफत शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन इर्शाद शेख फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे