You are currently viewing कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे माजी खास. निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

कणकवलीतील श्रीधर नाईक उद्यानाचे माजी खास. निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

नरडवे रोड लगत सेल्फी पॉइंटचे वचन सत्यात उतरणार:समीर नलावडे

कणकवली

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या गडनदी पुलाकडील श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कणकवली शहरात तरुणाई साठी वचन दिलेल्या सेल्फी पॉइंट च्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व नगरपंचायत चे नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. गेली तीन वर्षे महामार्ग चौपदरीकरणामुळे श्रीधर नाईक उद्यान हे बंद आहे. मात्र नगरपंचायत च्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा करत उद्याना करिता तब्बल 75 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली.

तर कणकवली शहरात पर्यटनदृष्ट्या सुविधा उपलब्ध करून देत असताना, गतवर्षी कणकवली शहरात सेल्फी पॉइंट उभारण्याचे वचन देण्यात आले होते. या वचनाची पूर्तता करत असताना कणकवलीतील तरुणाई करिता कणकवली नरडवे रोड लगत असलेल्या जागेत सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन देखील श्री राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कणकवली शहरात नाविन्यपूर्ण विकास कामे करत असताना मागील दोन वर्षे कोविड काळामुळे ही कामे ठप्प झाली होती. त्याची घोडदौड आता पुन्हा एकदा नगरपंचायत च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा