You are currently viewing दि.२६ फेब्रुवारी रोजी ‘गिर्यारोहण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

दि.२६ फेब्रुवारी रोजी ‘गिर्यारोहण’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

वैभववाडी

गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकाराची जिल्ह्यातील तरुणांना शास्त्रशुद्ध ओळख व्हावी आणि भविष्यात गिर्यारोहणाला चालना मिळावी या उद्देशाने ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेच्यावतीने गिर्यारोहण या विषयावर दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. गिर्यारोहण या विषयावर श्री. शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक व अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष मा.उमेश झिरपे मार्गदर्शन करणार आहेत.
शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पहिले व्याख्यान प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले आहे. तसेच दुसरे व्याख्यान सकाळी ठीक ११.३० वाजता श्री. अनगरसिद्ध शिक्षण संस्था संकुल सांगुळवाडी येथे संचालक श्री. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी श्री. शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक अ.म.गि.महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.ऋषीकेष यादव, प्रस्तरारोहक व गिर्यारोहक आशिष माने, सदस्य प्रवीण कदम आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर उपस्थित राहणार आहेत.
वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील गिर्यारोहक, गिर्यारोहण संबंधित संस्था व व्यक्तिंनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश नारकर, उपाध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.श्री.एस.एन पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा