You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले अभिनंदन..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले अभिनंदन..

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले. राज्य बँक आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते यावेळी ही भेट झाली. या भेटी दरम्यान जिल्हा बँकेच्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी शरद पवार यांनी घेतला.

शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाच्या ताब्यातील सिंधुदुर्ग जिल्हा बँक आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आणली. तेव्हा राज्यात या बँकेची सर्वात जास्त चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आज प्रथमच जेष्ठ नेते शरद पवार यांची आणि जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी भेट झाली यावेळी राज्य बँकेचे अध्यक्ष श्री. अनस्कर,राज्य बँक एम डी श्री.देशमुख, ठाणे जिल्हा बँकेचे चेअरमन श्री.पाटील, लातूर जिल्हा बँक अध्यक्ष धीरज देशमुख,असे राज्यभरातील ३१ जिल्हा बँकेचे चेअरमन उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा