इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील सोलगे मळा परिसरात हिमसितारा मंडळ व माणुसकी फौंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर आणि ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर अशा सामाजिक उपक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.अनोख्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
इचलकरंजी शहरातील सोलगे मळा परिसरातील
हिमसितारा तरुण मंडळाबरोबरच
माणुसकी फौंडेशन हे नेहमीच सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असते.विशेष अनाथ, निराधार बांधवांना मदतीचा हात देवून खरीखुरी माणुसकी जोपासण्याचे आदर्श व अनुकरणीय कार्य या दोन्ही संघटनांकडून होत असते.यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोफत नेत्र तपासणी व ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर असे सामाजिक उपक्रम घेवून साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सदर दोन्ही सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमास सोलगे मळा परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी ,सामाजिक कार्यकर्ते लहू कांबळे ,मार्गदर्शक शिवाजी कचरे,माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवि जावळे , प्रमुख सदस्य आनंद सालेचा ,हिमसितारा मंडळाचे अध्यक्ष रवि लोहार यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच नेत्र तपासणी व ई श्रम कार्ड नोंदणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवरांनी शिवजयंतीचे औचित्य साधून केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवण्यात येत असलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबीर व ई श्रम कार्ड नोंदणी शिबीर या दोन्ही उपक्रमांचे कौतुक करुन समाजातील प्रत्येक घटकाने या विधायख कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या भल्यासाठी सदैव कार्यरत रहावे ,असे आवाहन केले.
यावेळी चिमुकला श्रेयस माळी याने आपल्या खड्या आवाजात
शिवछत्रपतींचा पोवाडा सादर
करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.
यावेळी शिवछत्रपतींच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर व नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन हिमसितारा तरुण मंडळाचे कार्यवाहक व माणुसकी
फौंडेशनचे संस्थापक सदस्य कृष्णा इंगळे यांनी केले.
यावेळी हिमसितारा तरुण मंडळ,माणुसकी फौंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यासाठी मार्कन्डेय युवक मंडळ,मित्रप्रेम तरुण मंडळ,अष्टविनायक तरुण मंडळ,सर्वेश्वर युवक मंडळ,कट्टा बॉईज शहापूर या मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हिमसितारा तरुण मंडळाचे सदस्य रोहन बुचडे, अक्रम मुजावर,सागर पाटील,विनायक खेडेकर,दिपक कामत,संदेश म्हाकाळे,तेजस पाटिल,विनायक नाईक,विकी हिबारे, गोपाळ बुडके,साई चौगुले,हर्षद कदम,विनायक बारीगडे,अमन दफेदार,प्रेम जाधव,भूषण बोरगावे,दर्शन बोरगावे,सुरज कांबळे या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.