*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला*
*’ नथ ‘*
किती आकार प्रकार,
नवे नवे रंग रूप.
सर्व महिलांना हिचे,
किती अप्रूप अप्रूप.
पारंपारागत नथ,
तोरा आगळाच असे.
साजशृंगार पुरता,
तिच्याविना होतं नसे.
मामांजीनी आणविले
मोती टपोर, सुंदर.
हिरे माणिक लावून,
नथ गुंफतो सोनार.
नऊवारी नेसले मी,
छान अंबाडा घातला.
चूडामणी, कर्णफुले,
वेल लावियले त्याला.
कानी बुगडी घातली,
बिंदी भांगात शोभते.
नथ नाकात जाईना,
झाले हैराण पुरते.
भिकबाळी घालुनिया,
स्वारी ऐटीत सजली.
नथ घालून देण्याला,
कौतुकाने पुढे आली.
नथ घालता घालता
नाकामध्ये हळुवार,
ओठी हाताच्या स्पर्शाने,
धडधडे माझे उर.
मला अश्वस्थ कराया,
प्रेमे आलिंगन देई.
माझी अडकली नथ
म्हणे सोडवून घेई !!!
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
सर्व हक्क स्वाधीन
१४/९/२०