आरोंदा :
गोवा बनावटीच्या करमुक्त दारूची वाहतूक करणाऱ्या कार चालकाविरुद्ध आरोंदा किरणपाणी चेक पोस्ट वरील पोलिसांनी कारवाई केली. कारसह ३ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोंदा पोलीस दूरक्षेत्र कर्मचारी प्रवीण परब, बाबुराव जाधव, व भागीरथ मौळे यांनी ही कारवाई केली.