जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली काव्यरचना
राजा शिवछत्रपती महान, देशाची शान
राजा रयतेचा होता…
अभिमान राष्ट्राचा होता ….
स्वयंभू प्रज्ञेचा होता ….ऽऽऽऽऽ आ. जी जी जी जी…..,
देशप्रेम नसानसात,कीर्ती होती खेड्या पाड्यात
दीन दलितांचा कैवारी..
क्षत्रिय कुलास उद्धारी…
पूजनिय होती त्यास नारी … जी जी जी जी
मूठभर घेऊन मावळे,स्वराज्य स्थापिले
गनिमी काव्याने लढला..
बलाढ्य शत्रू तो पडला..
भल्या भल्यांना होता भारी…जी जी जी जी
कुस जिजाईची धन्य,कोणत्या जन्माचे पुण्य
धन्य तो महाराष्ट्र झाला…
गुलामीतून सोडवला…
दिली जाण अस्मितेची … जी जी जी जी
इतिहासी अमर तो झाला,स्वराज्य स्थापूनी
सिहांसनी बैसला ….
धन्य जिजाऊचे डोळे…
शिवाजी इतिहासा कोडे ….. जी जी जी जी!
प्रा. सौ . सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २१/०२/२०२१
वेळ : ११:५१. रात्री