जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी यांची काव्यरचना
किती वाढली गर्दी कशास जगाला दावू
जरा आडूशाला जावू चला आडूशाला जावू
गावं तसं चांगलं थोडं हायत वंगाळ
फोटू काढून कुणी गावात करील बवाल
पेरूच्या बागेत डोळ्यात डोळं घालून बसू
जरा आडूशाला जावू चला आडूशाला जावू
करते मनापासून पिरेम नाही हे दिखाऊ
हातात घेवून हात जोडीनं देवीला मग जावू
निवांत बसून दोगं गुलुगुलू बोलत राहू
जरा आडूशाला जावू चला आडूशाला जावू
मस्तानीस भेटाया आला बाजीराव राऊ
बघत्यात लपून छपून काऊ आणि चिऊ
पाहून पिरत अशी समद गाव लागलं जळू
जरा आडूशाला जावू चला आडूशाला जावू
विलास कुलकर्णी
मीरा रोड
१९.२.२०२२