खूप लोक परमेश्वराची भक्ती, भीतीपोटी किंवा लोभापायी करीत असतात हे योग्य आहे का?
अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास बहुसंख्य लोक परमेश्वराची भक्ती करतात ती सर्व प्रत्यक्षात विविध प्रकारची कर्मकांडे असतात. ही सर्व कर्मकांडे केली जातात ती केवळ भीतीपोटी किंवा लोभापायी. परमेश्वराच्या साम्राज्यात या सर्व कर्मकांडाना बिलकूल स्थान नसते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, *परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्कर्म करणे हाच होय.“माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे’ हे सत्कर्म होय.’क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्गनियमाप्रमाणे असे सत्कर्म केल्याने मानवजात सुखी होऊ शकते.थोडक्यात भीतीपोटी परमेश्वराची भक्ती करण्याऐवजी ती प्रीतीपोटी होणे आवश्यक आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.*
🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏