You are currently viewing माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणा अंतर्गत वैभववाडीत आतापर्यंत ७५५२ नागरिकांची आरोग्य तपासणी….

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणा अंतर्गत वैभववाडीत आतापर्यंत ७५५२ नागरिकांची आरोग्य तपासणी….

वैभववाडी :

कोविड 19 नियंत्रणासाठी व बाधित लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. वैभववाडी तालुक्यामध्ये 11465 कुटुंबे आहेत. त्या सर्व कुटूंबाचा आरोग्य विषयी सर्व्हे सुरू आहे. वैभववाडी तालुक्यात या मोहिमेला 16 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत 7,552 कुटुंबांचा आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन आरोग्याचा सर्वे करण्यात आला. या आरोग्य सर्व्हेमध्ये तालुक्यातील 6 व्यक्तींचे स्वब घेण्यात आले होते. त्यापैकी 4 व्यक्तींचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी दिली.

वैभववाडी तालुक्यामध्ये सध्या वैभवाडी शहर, तालुक्यातील सर्व गावागावातील वाडी – वस्त्यांमध्ये आरोग्य कर्मचारी जाऊन लोकाची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भेट घेऊन कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येकाला आरोग्य शिक्षण दिले जात आहे .
वैभववाडी तालुक्यामध्ये माझे कुटुंब नाझी जबाबदारी या अभियानामध्ये वैभववाडी गटविकास अधिकारी विद्या गमरे,सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कार्यक्षेत्रात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेत तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 33 टीमचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये 10 डॉक्टर, 8 आरोग्य सेवक, 20 आरोग्य सेविका ,45 आशा, 17 अर्ध वेळ परिचर, 8 पर्यवेक्षक, स्वयंसेवक असे 90 अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा