ना. भुजबळ यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादी अध्यक्ष अमित सामंत भेट घेणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदीची मुदत संपत आली असून अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे भात खरेदी करणे बाकी आहे शेतकऱ्यांचे शिल्लक असलेले भात योग्य प्रकारे खरेदी शासनाने केले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.तसे होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी संपर्क साधून मांडली,आणि काहीही करून भात खरेदीची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवून मिळावी यासाठी संबंधित मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या जवळ पाठपुरावा करून अडचणीत सापडणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी केली.यावेळी अमित सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री ना.छगन भुजबळ व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून भात खरेदीसाठी मुदतवाढ मिळवून देण्यासाठी खास बाब म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही शेतकरी भात खरेदीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल.असे अमित सामंत यांनी स्पष्ट केले.