You are currently viewing सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात “व्यक्तिमत्त्व विकास” विषयावर मार्गदर्शन…

सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात “व्यक्तिमत्त्व विकास” विषयावर मार्गदर्शन…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. आर. बी. शिंत्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. डी. जी. बोर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. आर बी. शिंत्रे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व त्याचबरोबर खेड्यांमध्ये असलेले लोकजीवन तेथील परंपरा यांचा जवळून अभ्यास करता येतो. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वीज वाचवा, लेक वाचवा, पाणी वाचवा असे उपक्रम घेतलेले असतात. या उपक्रमाचा प्रचार करणे, प्रसार करणे या संदर्भात विविध कार्यक्रमांचं नियोजन केले जाते. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्व गुण तसेच त्यांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. यावेळी त्यांनी शैक्षणिक बुद्धिमत्ते बरोबर भावनिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता याचा व्यक्तिमत्व विकासामध्ये फार मोठा लाभ हा विद्यार्थ्यांना होत असतो, असे सांगितले. ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक मोठा असतो ते जीवनामध्ये यशस्वी होतात,असे त्यांनी सांगितले. मार्क ट्वेन यांच उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की, शाळेच्या भिंतीच्या आतमध्ये जे शिक्षण होतं त्यापेक्षा फार मोठं शिक्षण हे शाळेच्या बाहेर म्हणजेच समाजामध्ये गेल्यावर मिळते. तो अनुभव फार मोठा असतो, असे अधोरेखित केले. आभार एनएसएस अधिकारी डॉ .यू. सी. पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा