*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांची काव्यरचना*
*ओढा!*
सांज सकाळीओढ्यातून
मी सहज फिरता
रंगबेरंगी दगड बोलती
पाण्यामध्ये शिरता
तळव्यावरी गुदगुल्या करी
इवले खोडकर खडे
हसता नाचता सवे
शिकवती मज धडे
गोल गोठी शेवाळलेले
पाय ओढुनी पाडती
भिजता भिजवता भय
माझे ते झाडती
उन्हं कोवळे शेकत बसे
मोठे दगड चतुर
साप खेकडे सोबती त्याचे
मी सरतो दूर दूर
रंग बटाटी दगड बोलके
अाकाराने नसे गोल की
बागेमध्ये ठेवता क्षणी
कळे त्याचेही मोल की
जलतरंग ते खळखळ,
मासे झुंडी करी वळवळ
पोरे खेळती,बायका धुती
स्वच्छ निर्मळ जळस्थळ
हिरवा शिवार करी ओढा
वळसा घाली तो गावाला
आता दिसे जागोजागी खड्डे
वाळू तस्कर वैर भावाभावाला
ओढा आता लढतो एकाकी
वाळू दगड लुटून नेले
शिवारी आले भकास बंगले
खिदळीत बसे रिजवीत पेले
©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.