मुख्याध्यापिका सौ. तृषाली कदम यांनी मानले आभार
एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प द कॉर्बेट फाउंडेशन , बांदा या प्रकल्पाचे प्रकल्प प्रबंधक राजेश सकट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केसरी या शाळेला के यान ( k-yan) हे डिजिटल उपकरण देण्यात आले.
यावेळी हे उपकरण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तृषाली कदम आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. दाणोली केंद्रातील देवसू, पारपोली ,तांबुळी केंद्रातील सरमळे देऊळ या प्राथमिक शाळांना हे उपकरण देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार अधिकारी चव्हाण, पंचायत समिती सावंतवाडी आणि दाणोली केंद्राचे केंद्रप्रमुख जी. ए.सावंत उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी सौ.बोडके आणि माजी पं.स. सदस्य राघोजी सावंत यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी केसरी शाळेच्या वतीने कृषी विस्तार अधिकारी चव्हाण, प्रकल्प प्रबंधक सकट व शेटकर यांचे शाल , श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी सृष्टी नाईक उपक्रमाचे कलाविष्कार या उपक्रमासाठी विशेष कौतुक करण्यात आले. व वैष्णवी सोमण या विद्यार्थिनीने कथक नृत्य या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचाही गुण गौरव करण्यात आला. ईशस्तवन,स्वागतपद्य केसरी विद्यार्थ्यांनी गायले यासाठी संगीत साथ सहाय्यक शिक्षक रोशन राऊत यांनी दिली.
सूत्रसंचालन शाळेचे पदवीधर शिक्षक दीपक राऊळ यांनी केले.प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कदम यांनी तर आभार सहाय्यक शिक्षक सुभाष सावंत यांनी मानले.
प्रकल्प समन्वयक दत्त जाधव व त्यांचे सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, व माता पालक संघ त्यांचे सदस्य व केसरी शाळेच्या शिक्षिका सौ.पाटील व सौ.सावंत-परब देवसू, पारपोली व सरमळे देऊळ या शाळांचे शिक्षक, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.