You are currently viewing भारताच्या गाणं कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस…..

भारताच्या गाणं कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस…..

आयकॉनिक गायिका लता मंगेशकर यंदा त्यांचा ९१ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मंगेशकर घराण्यात कदाचित एकमेव भारतीय गायक आहे जे पिढ्यान्पिढ्या सर्वाधिक आवडत्या आणि प् प्रेक्षकांच्या मनपसंत गायिका आहे.
लता‍ मंगेशकर यांनी अनेक गाण्यांना आवाज देऊन त्या गेल्या अनेक वर्षांत एक आख्यायिका बनल्या आहे.

लता मंगेशकर यांनी प्रतिभेमुळे उत्कृष्टतेचे उदाहरण साऱ्या जागा समोर आहे. त्यांचा प्रेमळ आवाजामुळे त्यांना गाणं कोकिळा संबोधले जाते.
त्यांचा गाण्यातील इतिहास हा काही कल्पित गोष्टींपेक्षा कमी नाही. त्यांनी आतापर्यंत १४ भाषांमध्ये ५०,००० पेक्षा जास्त गाणी गायलेली आहेत आणि अद्यापही प्रेक्षक वर्ग त्यांच्या गाण्यांचा चाहता आहे.
लता मंगेशकर यांना ‘बॉलीवूडची नाइटिंगेल’ म्हटले जाते, परंतु लता मंगेशकर यांना क्वीन ऑफ मेलॉडी, व्हॉईस ऑफ द नेशन आणि व्हॉईस ऑफ द मिलेनियम देखील म्हटले जाते.
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला.लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. १९७४ ते १९९१च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा