You are currently viewing बांदा तलाठी कार्यलयात महाराजस्व अभियान शिबिर संपन्न

बांदा तलाठी कार्यलयात महाराजस्व अभियान शिबिर संपन्न

बांदा पंचक्रोशीतील नागरिकांना विविध दाखल्याचे प्रांताधिकारी यांच्या हस्ते वितरण..

बांदा

महाराजस्व अभियाना अंतर्गत बांदा महाईसेवा केंद्रातून तयार करण्यात आलेल्या विविध दाखल्यांचे वाटप सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या अनेक दाखल्यांच्या समस्यांवर महाराष्ट्र शासनाने एक अधिसूची काढून हे दाखले विभागवार नागरिकांना द्यावे.

तसेच शासनाच्या विविध योजनाही नागरिकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते, असे सावंतवाडी प्रांताधिकारी श्री. पानवेकर यांनी सांगितले. बांदा दशक्रोशीतील नागरिकांना विविध दाखल्यांचे पानवेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी नायब तहसीदार मनोज मुसळे, बांदा मंडळ अधिकारी आर. वाय. राणे, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी, डेगवे तलाठी सुधीर नलावडे, तांबोळी तलाठी नेत्रा सावंत, असनिये तलाठी भिंगारे, बांदा महा ई सेवा केंद्र संचालिका सुनीता आईर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा