You are currently viewing काळीज

काळीज

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी विलास पंचभाई यांची अप्रतिम कविता

काळीज धडधडतं..
प्रेमाने कोणी हाक मारतं
कुणी आपल्या खांद्यावर
धायमोकलून रडतं…!

हवं असतं प्रत्येकाला प्रेम
प्रत्येकालाच मिळत नसतं
ज्याला मिळालं त्याने
पारीजातक जपायचं असतं…!

नको असतं प्रेमात
ताज महाल गुलाब रोझ
प्रेमाचे दोन शब्द
पुरे असतात हररोज…!

तीच असतं घरावर प्रेम
त्याने करावी अपेक्षा असते
सतत तिची ज्योत..घरासांठी
काळीज मात्र तुटत असते…!

आले किती संकट तरी
दोन हात करायचे असतात
घर संसार आणी काळीज
प्रेमाणे सांभाळायचे असतात…!

विलास पंचभाई
नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा