You are currently viewing मच्छिमार महिलांसाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन..

मच्छिमार महिलांसाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन..

केंद्र व राज्य शासनांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी लवकरच किनारपट्टीतील भागांमध्ये संस्थेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहा केरकर यांचा संपर्क दौरा

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे मच्छीमार महिलांना संस्थेच्या कामकाजाची आणि केंद्र व राज्य शासनांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी लवकरच किनारपट्टीतील भागांमध्ये संपर्क दौरा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहा केरकर यानी येथे दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 3600 सभासद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला संस्थेच्या सर्व सभासदाना त्यांच्या मच्छिमारीपूरक व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे आणि संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी प्रथम देवगड,वेंगुर्ले व मालवण तालुक्यातील किनारपट्टीतील पंचक्रोशीतील गावातून महिलांच्या बैठकांचे आयोजन करण्याचा निर्णय आज देवगड येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. देवगड तालुक्यातील समुद्र किनारपट्टीतील अनेक गावातील महिला कालवे,तिसरे,मुळे काढणे,खेकडे पालन करणे,मत्स्यपालन करणे वगैरे व्यवसाय कौटुंबिक चरितार्थासाठी करीत असतात.त्यांना मत्स्यसंपदा योजना, कांदळवन योजना,यूएनडीपी, एमपीएडा यांच्या माध्यमातून सवलतीच्या योजना प्राप्त करून देणे, त्यांना संस्थेचे सभासद करणे, तसेच प्रत्येक मच्छीमार महिलांना ओळखपत्र देणे वगैरे बाबत सहकार्य करून मच्छीमार महिलांची एकजुट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच जिल्हा बँकेने सहकार्य केल्यास मासे खरेदी विक्रीसाठी कर्ज पुरवठा करणे, संस्थेचे मालवण येथे स्वतंत्र कार्यालय सुरु करणे वगैरे उपक्रम राबविणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठक ही सौ. दीक्षिता धूरी यांचे निवासस्थानी संपन्न झाली.

याबैठकीस संस्थेच्या संचालिका सौ. प्रियंका तारी, उष.कला केळूस्कर,स्वप्नाली तारी, नीता कोचरेकर,डॉ. जितेंद्र केरकर,लक्ष्मण तारी तसेच सौ. सारिका मोरजे,मानसी मालंडकर, राजलक्ष्मी शिरोडकर, वैभवी चौकेकर या संचालिका उपस्थित होत्या.

देवगड तालुक्यातील बैठकांसाठी विजयदुर्ग, गिर्रये, पडेल, वाडातर, जामसांडे, आनंदवाडी, तारामुंबरी, किल्ला, मिठबांव, तांबळडेग, मोर्वे वगैरे भागातील मच्छीमार महिलानी सौ. प्रियांका तारी व उष.कला केलुस्कर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा