देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले असून नगराध्यक्षपदाची निवड ही 14 फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले मात्र यासाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज ८ फेब्रुवारीला देवगड जामसंडे नगरपंचायत मध्ये सुरू होती. यामध्ये महाविकास आघाडी कडुन शिवसेनेच्या साक्षी गजानन प्रभू यांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर भाजपकडून सौ प्रणाली मिलिंद माने यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. या अर्जाची पूर्णतः छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यानंतर नगराध्यक्षपदाची निवड ही 14 फेब्रुवारीला होणार आहे .
नगराध्यक्ष पदासाठी साक्षी गजानन प्रभू त्यांच्या नावाची शिफारस नगरसेवक रोहन खेडेकर व विशाल मांजरेकर यांनी केली तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून प्रणाली मिलिंद माने यांचा अर्ज दाखल केला त्यांच्या नावाची शिफारसही नगरसेवक शरद ठुकरूल व नगरसेविका अरुणा पाटकर यांनी केली. आज नगराध्यक्षपदाच्या दाखल उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन १४ फेब्रुवारीला नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे.