You are currently viewing वाभवे-वैभववाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून नेहा माईणकर 

वाभवे-वैभववाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून नेहा माईणकर 

शिवसेनेकडून सानिका रावराणे यांचा अर्ज दाखल

वैभववाडी

वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून नेहा माईणकर तर शिवसेनेकडून सानिका रावराणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.१४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मतदानाद्वारे ही निवड जाहीर होणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली. त्याकरिता आज दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करायची मुदत होती. भाजपाकडून नेहा दिपक माईणकर तर शिवसेनेने सानिका सुनील रावराणे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्याकडे हे दोन्ही अर्ज सुपुर्द करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, सज्जनकाका रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, नगरसेवक रोहन रावराणे, संजय सावंत, विवेक रावराणे, राजन तांबे, नगरसेविका नेहा माईणकर, सुंदरा निकम, रेवा बावधाणे, संगीता चव्हाण, यामीनी वळवी, सौ. स्नेहलता चोरगे, प्राची तावडे, किशोर दळवी, बंड्या मांजरेकर, सुनील भोगले, माजी नगरसेवक संताजी रावराणे, संतोष माईणकर, माजी सभापती बाळा हरयाण, सीमा नानीवडेकर, प.स.सदस्या हर्षदा हरयाण, दिपक माईणकर आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तर शिवसेनेच्या सानिका रावराणे यांचा अर्ज दाखल करताना तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी बँक संचालक दिगंबर पाटील, नगरसेवक प्रदीप रावराणे, रणजित तावडे, माजी नगरसेवक संतोष पवार, सुनील रावराणे, बाळा इंदप आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा